जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या १४ जणांना अटक -बीड/गाव माझा न्यूज

बीड/रोहिदास हातागळे

प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना करण्यात येत असताना अनेक जातीय तेढ निर्माण करणारे लोक याचा फायदा घेत आहेत.व्हाट्स अपच्या माध्यमातून हे जातीयवादी लोक हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करत आहेत.गेल्या पाच दिवसात १० गुन्हे दाखल करण्यात आले असून १४ लोकांना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे समाजातील निर्माण करणारे काही लोक आहेत त्यांच्या विरुद्ध बीड पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून यापुढे सामाजिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीबरोबर त्या व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमिन वर ही कारवाई होणार असल्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

One thought on “जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या १४ जणांना अटक -बीड/गाव माझा न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *