
उमरगा – प्रतिनिधी
श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय, उमरगा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. प्राचार्य डॉ.विजय सरपे यांच्या हस्ते व कर्मचारी आणि विध्यार्थी यांच्या उपस्थितीत प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय सरपे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणात देण्यात आलेल्या योगदानाबद्दल माहिती सांगितली आणि विद्यापीठीय शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी प्राध्यापक व विध्यार्थी इत्यादींनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आवश्यक असून समाजाच्या व देशाच्या गरजा पूर्ततेचे प्रतिबिंब विद्यापीठ शिक्षणात दिसून यावे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला शोभेल असा गुणवत्ताधारक शैक्षणिक प्रवास होण्यासाठी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व मानवी घटकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरच या विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव दिल्याचे सार्थक होईल असे मत मांडले. या प्रसंगी प्रा.डॉ.कदम प्रवीणकुमार, प्रा.पवार भाऊ, प्रा.अंकुश संतोष , प्रा.चव्हाण देविदास, प्रा.करंडे तेजस्विनी , श्री लाटे अभिजित, श्री, मोरे विजयकुमार श्री दुर्गे माधव, श्री सुरवसे दगडू, प्रशिक्षणार्थी कांबळे महेश, मानतुटे किरण इत्यादी उपस्थित होते.