डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षाचा इतिहास लाभला आहे. प्राचार्य डॉ. दिलीप गरूड .

उमरगा – प्रतिनिधी
मराठवाडा हि संतांची भूमी आहे. मराठवाड्याच्या मातीला परिवर्तन व संघर्षाची परंपरा लाभली आहे. सामाजिक बदल घडवून आणण्या करीता अनेकांना संघर्ष करावा लागला.परिवर्तनाच्या संघर्षा मुळे व अनेकांच्या बलिदाना मुळेच मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नांव देण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बलिदानाचा इतिहास लाभला आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांनी केले.
१४ जानेवारी मकरसंक्रांत रोजी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा केला जातो . येथील आदर्श महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा इतिहास स्पष्ट केला. उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराला सामाजिक परिवर्तनाचा इतिहास लाभला आहे. सामाजिक बदल घडवून आणण्या करीता अनेकांना संघर्ष करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठा मुळे मराठवाड्यातील शेतकरी , शेतमजूर व सर्व सामान्यांच्या विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली. मराठवाडयातील जनतेला विद्यापीठ नामांतरा मुळे वैचारिक व शैक्षणिक प्रक्रियेचीचालना मिळाली. विद्यापीठा मुळे सामान्य माणसाना जगण्याचे शिक्षण मिळाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली उच्च शिक्षणाची अभिसरण प्रक्रिया अखंडीत पणे या विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू आहे. सलग अठरा वर्ष सुरू असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या या संघर्षमय लढयाची जाणीव ठेवून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी उच्च शिक्षणातून आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नावलौकिक शिक्षण क्षेत्रात करावा अशी अपेक्षा डॉ. गरूड यांनी केली.
प्रास्तावीक उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी केले .सुत्रसंचलन प्रा.डॉ. बालाजी मोरे यांनी केले .आभार प्रा.डॉ. उदय दिंडोरे यांनी मानले . कार्यक्रमा साठी प्राध्यापक , कर्मचारी , विद्यार्थी मोठया संख्येनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *