नारायण मुळे गुरुजी यांचे निधन !

उमरगा – प्रतिनिधी

तालुक्यातील नारंगवाडी येथील सेवा निवृत्त शिक्षक श्री नारायण माधवराव मुळे यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने आज गुरुवारी दुपारी ३=३० वाजता दुःखध निधन झाले. जुन्या पिढीतील विद्यार्थी प्रिय संस्कारीत शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षकी व्यावसाया बरोबरच त्यांना अध्यात्म व शेती व्यावसायाची विशेष आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी दोन भाऊ एक बहीण सुना नातवंडे असा मोठा परीवार आहे. उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील विष्णू मुळे यांचे ते जेष्ठ बंधू होत. शुक्रवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ठीक ११=०० वाजता नारंगवाडी येथील त्यांच्या स्वतःच्या शेतीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *