कंटेकूर जि.प. शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंत्ती उत्साहात !

उमरगा: प्रतिनिधी

तालूक्यातील कंटेकुर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जंयती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.
प्रारंभी क्रांतीज्योती, आध्यशिक्षीका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन ग्रामपंचायत सदस्या अनिता स्वामी व अंगणवाडी कार्याकरत्या स्वाती कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. कमलाकर मोटे यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सावित्रीबाई यांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता गायन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या स्वाती कुलकर्णी यांनी महिलांचे शैक्षणिक योगदान याबाबत मार्गदर्शन केले. स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर अनिता स्वामी, स्वाती कुलकर्णी, बबिता निंबाळकर आणि संध्याराणी कलशेट्टी यांचा महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी सहशिक्षक लक्ष्मण येवते, गोविंद जाधव, विठ्ठल कुलकर्णी, स्वामी शिवकुमार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कल्लेश्र्वर पांचाळ व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत पटणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *