
सस्नेह नमस्कार🙏
- उमरगा – मारूती कदम
सेवांतर्गत सुधारीत आश्वासीत प्रगती योजनेच्या संदर्भातील दोन शासन निर्णयांचे पुनर्जीवन करणे अणि दहा वीस व तीस वर्षांच्या सेवेनंतरच्या तीन लाभांची योजना लागू होणे,या दोन महत्वाच्या मागण्यांच्या संदर्भात दि.०१/०१/२०२१ रोजी मा.डाॅ आर बी सिंह सर आणि मा. रा.जा.बढे सर यांच्या नेतृत्वाखाली महासंघ पदाधिकारी समितीची सन्माननीय सुप्रिया ताई यांच्या समवेत तसेच सन्माननीय ना.शरदचंद्ररावजी पवार साहेब यांच्या समवेत आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे बैठक संपन्न झाली. सदर बैठकी मध्ये मा.सुप्रिया ताई यांनी या प्रकरणात मी स्वतः जातीने लक्ष घालून पञ व्यवहार करून येत्या मंगळवार पर्यंत प्रश्न मार्गी काढण्या बाबतीत प्रयत्न करते असं अश्वासन दिले आहे.
सन्माननीय शरदचंद्ररावजी पवार साहेब यांच्या समावेत झालेल्या बैठकीत त्यांनी संपूर्ण विषयाची माहिती समजून घेतली. अणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंञी महोदय मा उदयजी सामंत तसेच वित्त विभागाचे मंत्री महोदय मा अजित पवार यांच्या नावे संघटनेचे पञ आजच मला द्या. मी माझ्या स्वत च्या आदेश अन्वये येत्या आठ दहा दिवसात दोन्ही मंञ्याची बैठक याच ठिकाणी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजित करून हा प्रश्न मार्गी काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो असं अश्वासन दिले आहे. या बैठकीला सन्माननीय डाॅ आर बी सिंह सर मा रा.जा बढे सर मा.राजेंद्र गोटे सर, मेघराज पंडीत, दिलीप पवार, माधव राऊळ, ॠषिकेश चित्तम ,चंद्रकांत धनावडे,दिलीप जाधव,प्रभाकर शिंदे, राजेंद्र गिड्डे, चंदर पांडे, प्रविण खामकर उपस्थित होते. सदरच्या दोन्ही बैठकींच नियोजन अणि आयोजन दिलीप पवार यांचे मिञ सन्माननीय विक्रमजी खामकर यांनी गेले पंधरा दिवस सतत पाठपुरावा करून घडवून आणली.