उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्याच्या बिअरबार संघटनेच्या अध्यक्षपदी राजेंद्र पतगे यांची निवड !

उमरगा – प्रतिनिधी
उमरगा -लोहारा – तुळजापूर तालुका बियरबार संघटनेच्या अध्यक्षपदी राजेंद्र पतगे यांची निवड करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटा मुळे गेल्या एक वर्षाच्या कालावधि दरम्यान सर्वत्र मद्य विक्री व्यावसाय अर्थिक कचाट्यात सापडला आहे. या व्यावसायाचे आर्थिक सक्ष्मीकरण व्हावे या करीता उमरगा – लोहारा नळदुर्ग , जळकोट या विभागातील बिअरबार चालक मालक संघटनेच्या वतीने मंगळवारी हॉटेल सोनाई चौरस्ता येथे बैठक घेण्यात आली . या बैठकीत राजेंद्र पतगे यांची उमरगा लोहारा जळकोट नळदुर्ग या विभागा करीता सर्वानुमते अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तुरोरी, लोहारा, जळकोट , नळदुर्ग या विभागा करीता प्रभाकर जाधव , नित्यानंद नारायणकर, अभिजित गंगणे सुधीर मोठे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली .
सुनिल राठोड यांची सचिवपदी तर किशोर कांबळे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विजय तपसाळे , किशन बालकुंदे , दत्ता कांबळे , राजु साळुंके यांची सल्लागार पदी नियुक्त्ती करण्यात आली.
चेतन बोडके , रमेश पिस्के, विक्रम पवार, प्रवीण तपसाळे , सिध्दय्या गुत्तेदार , चंद्रकांत कुंभार, श्रीहरी बोडगे , गणेश घोडके, अनिल कांबळे , शहाजी कोकाटे , विठ्ठल दुधभाते, दिनकर शेट्टी, गणपती मोरे, जितेंद्र काळे सह आदिंची सभासद सदस्यपदी निवड करण्यात आली आहे . बिअर बार चालक मालक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *