
विजय चौधरी, सोयगाव,औरंगाबाद
सोयगाव:-चाळीस ग्रामपंचायती पैकी नऊ ग्रामपंचायतींच्या लढतीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल होण्याच्या आधीच लक्षवेधी लढती होत असल्याचे चित्र रविवारी(दि.२७)आढळून आले आहे.त्यामुळे या नऊ ग्रामपंचायतीच्या लक्षवेधी लढतींकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
१० पेक्षा जास्त सदस्य सख्या असलेल्या घोसला,जरंडी,निंबायती,आमखेडा,बनोटी,गोंदेगाव,किन्ही,फर्दापूर आणि सावळदबारा,या नऊ ग्रामपंचायातींसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या आधीच राजकीय वातावतार्ण गरम झाले असून या नऊ ग्रामपंचायतींच्या लक्षवेधी लढतींमुळे सोयगाव तालुका तापणार आहे.यामध्ये या सर्व नऊच्या नऊ ग्रामपंचायातींवर मातब्बरांचे वर्चस्व आहे.त्यामुळे वर्चस्वाची लढाई मध्ये या नऊ ग्रामपंचायती गुंतणार आहे.यामध्ये दोन हजार पाचशे पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या सहा ग्राम पंचायती असून तीन हजारांपेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या तीन ग्राम पंचायती असून फर्दापूर हि तालुक्यातील सर्वात जास्त मतदार संख्या आणि सदस्य संख्या असलेली एकमेव ग्राम पंचायत आहे.यामध्ये फर्दापूर,जरंडी,निंबायती,आमखेडा,सावळदबारा या पाच ग्राम पंचायती सिल्लोड विधानसभा मतदार संघातील तर घोसला,बनोटी,किन्ही गोंदेगाव,या चार ग्राम पंचायती कन्नड मतदार संघात येत आहे.त्यामुळे सत्तेत असलेल्या शिवसेना आमदारांची या नऊ ग्रामपंचायती प्रतिष्ठेच्या ठरणार असून जरंडी,आमखेडा,निंबायती या तीन ग्राम पंचायातींवर भाजपाच्या जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई काळे यांचे लक्ष असल्याने या तीन ग्रामपंचायती साठी भाजपा विरुद्ध शिवसेना अशा लढती रंगणार आहे.
———-जरंडी,निंबायतीच्या मतदारांवर पुढाऱ्यांचा डोळा————-
विधानसभा ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जरंडी,निंबायतीच्या मतदारांवर राजकीय पुढाऱ्यांचा डोळा लागून असतो हि परंपराच असतांना जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये भाजपाने या भागात बाजी मारून जिल्हा परिषदेवर पुष्पा काळे आणि पंचायत समितीवर भाजपाचे संजीवन सोनवणे,लता राठोड यांनी बाजी मारली होती त्यानंतर मात्र झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या दोन्ही गावातून मोठे मताधिक्य घेवून भाजपाचा सुरुंग फोडला होता.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही गावांमध्ये भाजपा-शिवसेना यांच्यात लक्षवेधी लढती ठरणार आहे.