विदर्भातील पहिल्या सिम्पली देशी स्टोअरचे उद्‌द्घाटन !

विदर्भातील पहिल्या सिम्पली देसी स्टोर चे भंडाऱ्यात उदघाटन

तेजोनिधी सेंटर फॉर सोशल डेव्हलपमेंट चा उपक्रम
राजू आगलावे/ भंडारा
गाव माझा न्यूज
भंडारा : -देशभरातील स्थानिक बचतगट , लघु- उद्योजकांच्या उत्कृष्ट उत्पादनांना राष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम करीत असलेल्या सिम्पली देसी व्हेंचर्स च्या विदर्भातील पहिल्या वहिल्या अत्याधुनिक दुकानाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. येथील तेजोनिधी सेंटर फॉर सोशल डेव्हलपमेंटच्या प्रयत्नाने भंडारा येथील संयुक्ता महिला बचत गटानेच हे दुकान चालविण्याचा निर्णय घेत, वेगळा पायंडा पाडला आहे. यासाठी तेजोनिधी सेंटरच्या अध्यक्षा शुभांगी मेंढे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
बचत गटाने निर्मित केलेल्या व दर्जेदार राहणाऱ्या उत्पादनांना पॅकिंग आणि अन्य कारणामुळे योग्य अशी बाजारपेठ उपलब्ध होत त्यामुळे स्वदेशी उत्पादनांना लोकांपर्यंत पोहोचविण्यात अनेक अडचणी येत होत्या. ही गरज लक्षात घेत सिम्पली देसी या कंपनीने अनेक बचतगट, लघुउद्योजक, स्थानिक उत्पादक, कुटीर उद्योग यांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला काम सुरू केले आहे. सिंपली देसीच्या माध्यमातून मोठमोठ्या शहरात स्टोर उभे करून त्यातून बचत गटाने रेल्वेत वस्तूंची विक्री आकर्षक पद्धतीने केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून भंडाऱ्यात विदर्भातील पहिल्या स्टोरचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील छोट्या छोट्या उद्योजकांना आत्मनिर्भर करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे उद्घाटनाच्या वेळी माजी मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार सुनिलजी मेंढे, व्यवस्थापकीय संचालक सिम्पली देसी मधुबाला साबू, कार्यकारी संचालक पंकज गौतम प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थित महिला बचत गट सदस्यांना नगर परिषद मुख्याधिकारी विनोद जाधव व उमेद प्रकल्पाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गौरव तुरकर यांनी विविध योजना विषयी माहित दिली. तेजोनिधी सेंटर फॉर सोशल डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा शुभांगी सुनील मेंढे यांनी तेजोनिधी मार्फत सुरू असणाऱ्या व भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली. भविष्यात सिम्पली देसी कंपनीचे आऊटलेट स्टोर तेजोनिधी सेंटर फॉर सोशल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अधिकाधिक महिला बचत गटांना सोबत घेऊन उभे करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला संयुक्ता महिला बचतगट अध्यक्षा किशोरी नाकाडे, सचिव श्रीमती चेतना कोरे, सदस्य वर्षा पोटोले, मीना गोबाडे, सरिता कापगते, लता चौधरी, पूजा माहूरले, आभा निनावे, सीमा गोंडाले उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *