सर्व सामान्याना न्याय मिळणारे विषय पत्रकारानी हाताळावेत ! पो.अ. वसंतराव जाधव .

सर्व सामान्यांना न्याय मिळेल असे विषय माध्यमांनी हाताळावे : पो.अ. वसंत जाधव
पत्रकार भवन येथे राष्ट्रीय पत्रकार दिन संपन्न
राजू आगलावे/भंडारा
गाव माझा न्यूज
भंडारा-पत्रकारिता हा लोकशाहीचा कणा असून प्रसारमाध्यमांनी सर्व-
सामान्यांना न्याय मिळेल असे विषय मार्मिकपणे हाताळावे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांनी दि. १६ नोव्हेंबर २०२० रोजी मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिना- निमित्तच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम तसेच ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर मुंदे, नंदकिशोर परसवार व पत्रकार संघाचे सचिव मिलींद हळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन भैरम यांनी केले. त्यांनी बदलत्या युगात पत्रकारांची भुमिका आणि त्यांचे कर्तव्य या विषयावर प्रकाश टाकला. विशेष म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करित, ग्रामीण समस्यांकडे लक्ष केंद्रीत करून, ग्रामीण विकासावर भर देण्याविषयी चिंतन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन मेश्राम तर उपस्थितांचे आभार मिलींद हळवे यांनी मानले.
कार्यक्रमाला वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष किशोर मोरे, वृत्तपत्र विक्रेता संघाचे विजय निर्वाण, नरेंद्र गौरी तर पत्रकार बंधूंमध्ये आबिद सिद्दीकी, सुरेश कोटगले, दिपक रोहणकर, राजू आगलावे, प्रशांत देसाई, विलास सुदामे, दिलीप देशमुख, ललीतसिंह बाच्छिल, प्रमोद भांडारकर, यशवंत थोटे, विलास केजरकर, सुरेंद्र पारधी, शारदा पडोळे, नेहाल भुरे, उमेश जांगळे, राकेश शामकुवर, परमेश्वर शेंडे, सर्वर शेख, सचिन मेश्राम, सैय्यद जाफरी, जाहीद शेख, विकास बांते, सुशिल जनबंधू, इरफान खान, चेतन शेंडे, पृथ्वीराज बन्सोड, संजय भोयर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *