प्रसाद दिवाळी अंका मुळे नवोदित साहित्य निर्मिती झाली !पोनि मुकुंद आघाव .

प्रसाद दिवाळी अंकाने नवोदित साहित्यीकांना लिहीते केले…… पो. नि. मुकुंद आघाव.

उमरगा : मारूती कदम

प्रसाद दिवाळी अंकाने ग्रामीण भागातील नवोदित लेखक, कवी,साहित्यिक यांना लिहीते करीत उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे साहित्यिकांची चळवळ उभे राहील असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. मुकुंद आघाव यांनी केले.

प्रसाद दिवाळी विशेषांक 2020 – 21 या सातव्या अंकाचे प्रकाशन गुरूवार दि. 12 रोजी सकाळी 09:30 वा. पोलीस ठाणे उमरगा येथे करण्यात आले.

या वेळी व्यासपीठावर अचलबेट देवस्थानाचे ह.भ.प. हरी गुरूजी लवटे महाराज, मुख्याध्यापक तथा कवी कमलाकर भोसले, नगरसेवक अरूण इगवे, संपादक लक्ष्मण पवार, उपसंपादक नसरोद्दीन फकीर, प्रसाद जाधव, रोटरीचे सचिव अनिल मदनसुरे, रोटरीचे माजी अध्यक्ष प्रविण स्वामी, अजित उर्फ बंडू नेलवाडे, निजाम व्हंताळे, कवी बालाजी इंगळे, भुमीपुञ वाघ, पोलीस अधिकारी रमाकांत शिंदे, पञकार बालाजी वडजे, मारूती कदम, प्रदिप भोसले, शंकर बिराजदार, नितीन सुर्यवंशी, लक्ष्मीकांत पटणे, अदिनाथ भालेराव, मनिष सोनी पोलीस कर्मचारी चंद्रकांत गायकवाड, कांत राठोड, लता राठोड यांच्या हस्ते प्रसाद दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन झाले.

यावेळी पुढे बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, म्हणाले की, ग्रामीण भागातील साहीत्यीकांना साहीत्य प्रकाशन करण्यासाठी भरपूर खटपट करावी लागते, परंतू पञकार लक्ष्मण पवार यांनी प्रसाद च्या माध्यमातून नवोदितांना सर्वच साहीत्य लेखक, कवी, रसीकांना व्यासपीठ मिळवून दिले आहेत. याच बरोबर शालेय साहीत्यांना स्थान मिळवून दिलेले आहेत.उमरग्यासारख्या ठिकाणी प्रसाद च्या रूपाने ग्रामीण भागातील चांगला दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. याचे निश्चितच कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.

ह.भ.प. हरी लवटे गुरूजी यांनी प्रसाद च्या सर्व सहकारी यांना शुभेच्छा देत भविष्यात येणारा अंक आणखीन दर्जेदार व्हायला पाहिजेत असे म्हणून शुभेच्छा दिल्या.

कवी बालाजी इंगळे बोलताना म्हणाले की, साहित्य क्षेत्रात लहाणपणापासून अबाल वृध्दांपर्यंत सर्वांना समजेल असा सजग दिवाळी अंक असून साहित्याची ओढ काय आहे हे समजून ग्रामीण भागात प्रसाद ने चांगला दर्जेदार अंक आमच्या हस्ते प्रकाशित केल्याने समाधान व्यक्त केले.

कवी कमलाकर भोसले म्हणाले की ग्रामीण भागातील साहीत्य शहरी भागात चांगल्या प्रकारे प्रकाशित होते. त्याच साहीत्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पहिला अंक ते सातव्या अंका पर्यंतचा प्रवास मी स्वतः पाहीला आहे. भरपूर आडचणी आहेत त्यावर मात करत महाराष्ट्रातील जवळपास 450 दिवाळी अंक निघतात त्या अंकाच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील नवोदित साहित्य घेवून दर्जा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. असे गौरवोद्गार काढले.

प्रसाद दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याचे सुञसंचलन प्रविण स्वामी यांनी केले. प्रास्ताविक प्रसाद चे संपादक लक्ष्मण पवार यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार कवी भुमीपुञ वाघ यांनी मानले.

या सोहळ्यास नवोदित लेखक, कवी यांच्यासह शहरातील पञकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *