कॅप्टन जोशी विद्यालया कडून विद्यार्थ्यांना घरपोच स्वाध्याय पुस्तीका वाटप !

==========================

उमरगा – रोहित गुरव

उमरगा तालुक्यातील येणेगूर शाळेच्या वतीने पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू असलेल्या शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अडचणी व उपाय याबाबत अवलोकन करून पालक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्यात आला व यावेळी विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तके देण्यात आले . येणेगूर नळवाडी महालिंगरेवाडी सूपगाव तुगाव या गावातील विद्यार्थी कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगूर येथे शिकतात . प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ऑनलाइनाबाबत पालक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्यात आला . हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी श्री परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव श्री बि ए बिराजदार साहेब प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बादुले एस व्ही सर श्री देवराज बिराजदार सर श्री शंकर हुळमजगे सर श्री व्यंकट बिराजदार श्री महेश खंडाळकर श्री महेश हरके श्री चंद्रकांत बिराजदार श्री आनंदराज बिराजदार सर श्री अविनाश दुनगे श्रीमती कीर्तने के बी श्री गेडाम सर श्री सौरभ उटगे सर प्रा बगले सर प्रा माहदेव बिराजदार सर व सर्व शिक्षक यांनी गृहभेटी करून विद्यार्थ्यांनी कोरोना काळातील केलेल्या अभ्यासाचा तपासणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *