Aurangabad..आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण/गाव माझा न्यूज औरंगाबाद

विजय चौधरी, औरंगाबाद

औरंगाबाद, दिनांक 10 पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यादृष्टीने पोलिस, महसूल अधिकारी आदी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेऊन आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर राजकीय पक्ष, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधीं यांना आवश्यक असणा-या विविध परवानग्या एक खिडकी सुविधेतून देण्यात येणार असल्याने सर्वांनी निवडणूक अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तत्पर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कायदा व सुव्यवस्था व आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत

श्री.चव्हाण यांच्याअध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस पोलिस आयुक्त निखील गुप्ता, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी आदींची उपस्थिती होती.

तात्पुरते प्रचार कार्यालय, वाहन परवाना, होर्डिंग, बॅनर, झेंडे, पोस्टर, ध्वनीक्षेपक, मिरवणूक, रॅली, रोड शो, जाहीर सभा, राजकीय पक्षांच्या बैठका, चौक सभा आदींच्या परवानग्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुविधेतून कार्यालयीन वेळेत मिळणार असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या प्रकरणावर तत्काळ प्रक्रिया करावी, जेणेकरून राजकीय पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणेत योग्य समन्‍वय राखून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल. तसेच पोलिस व संबंधित विभागांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून आवश्यक असणारी कार्यवाही तत्काळ करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अप्पर जिल्हाधिकारी श्री.गव्हाणे यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती व करावयाची कार्यवाही याबाबत माहिती दिली. पोलिस आयुक्त श्री.गुप्ता यांनीही पोलिस विभागाला आवश्यक त्या सूचना केल्या.

राजकीय पक्षांशीही साधला संवाद

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी राजकीय पक्षातील प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्त्र संवाद साधला. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व सुविधांबाबत उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला. या बैठकीस डॉ.कल्याण काळे, डॉ. भाऊसाहेब जगताप, राजेश मेहता, नितीन बागवे, विजय औताडे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *