प्राचार्य वेदालंकार यांना राष्ट्रीय पुरस्कार !

रोहित गुरव

उमरगा रोहित गुरव

आपण काय होतो, त्या परिस्थितीचे भान लक्षात ठेउन, आपली व समाजाची उन्नती करणे यातच माणसाचा मोठेपणा आहे. माणसाने आपले कार्य करत राहावे त्यातून मिळणाऱ्या प्राप्तीची अपेक्षा न करता कार्य करणाऱ्यास फळ मिळतातच असे मत सत्काराला उत्तर देतांना प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्याचे, कादंबरीचे, पौराणिक ग्रंथाचे हिंदीत अनुवाद केल्याबद्दल प्राचार्य वेदालंकार यांना हिंदी विषयातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला त्यानिमित्ताने मोहिब कादरी ( दाबका ) यांच्या वतीने श्री वेदालंकार यांचा सपत्नीक सत्कार रविवारी ( ता. 08 ) इंद्रधनू वृद्धश्रम येथे करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दामोदर पतंगे होते. सौ. प्रतिभा वेदालंकार, प्रा. द. मा. माने , डॉ. दामोदर पतंगे, नितीन होळे, मनिष सोनी, सचिन लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री वेदालंकार म्हणाले, मराठी पुस्तकाचे हिंदीत अनुवाद करताना फक्त कर्तव्यच केले. त्याची शासनाच्या हिंदी विभागाने दखल घेऊन सन्मान केला. असेच कार्य अपेक्षा न ठेवता श्री कादरी करतात हे स्तुत्य कार्य आहे.
यावेळी श्री कादरी व डॉ. पतंगे यांची भाषण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभयकुमार हिरास यांनी करून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *