भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना प्रतिटन १०० रू. जादा हप्ता जमा करणार !

रोहित गुरव – उमरगा

उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील क्युनर्जी इंडस्ट्रीज लिमिटेड संचलीत भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याकडुन गतवर्षीच्या गाळप हंगामातील प्रतिटन १०० रुपये प्रमाणे जास्तीचा हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा.

कारखाना व्यवस्थापनाकडून गतवर्षीच्या १९-२० या गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी गाळपास आलेल्या ऊसाला एफ आर पी पेक्षा प्रति टन १०० रुपये जास्तीचा दर दिवाळी पुर्वी देण्याचे जाहीर करण्यात आले होते त्याप्रमाणे दि २ नोव्हेंबर रोजी संबंधित ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यावर प्रति टन १०० रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी सांगितले.यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *