अंधश्रध्दा पसरविणाऱ्या दोन महिलांना अटक !

उमरगा – रोहित गुरव

घरातील व्यक्ती आजारी राहत असल्याने अघोरी कृत्य करण्याचा प्रकार दि.३ ऱोजी उघडकीस आला होता . याप्रकरणी दोन महिला व एका पुरुषावर उमरगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता . दोन दिवसांच्या कसून चौकशीनंतर या प्रकरणी दोन महिलांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली .
सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील नाईचाकुर येथे हैदर महेबुब मुल्ला यांचे नावे भुकंपातील पुनर्वसित घर आहे . हैदर मुल्ला यांचे निधन झाल्याने दोन खोलीच्या घरात कुणीही रहात नव्हते. या घरात तैसिन पाशामियाँ मुल्ला हिने घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे कसली तरी पुजा करणार असल्याची माहिती मंगळवार दि.3 रोजी आतिक महेबूब मुल्ला यांनी पोलिस पाटील बाळू स्वामी यांना सांगितली. तेंव्हा श्री. स्वामी यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव विठठल पवार, राजेंद्र काशीनाथ डिगुळे, गोविंद माधवराव पवार व अन्य लोकांना घेऊन त्या घराची पाहणी केली असता एका खोलीत फरशा काढून एक मोठा खड्डा खोदलेला दिसला, त्यामध्ये फुटलेले नारळ, लिंबु असे पुजाचे साहित्य पुजा करून पडलेले होते. तसेच बाजुस दोन टिकाव, फावडा पडलेला दिसून आला व बाजुचे खोलीमध्ये तीन कलताणी पोते, दोन लिंबु व नारळ असे साहित्य अघोरी प्रथा व जादुटोना करून पडलेले दिसले. या बाबतची माहीती पोलिस पाटिल यांनी उमरगा पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व पोलिस पाटिल यांच्या फिर्यादीवरुन तैसिन पाशामिया मुल्ला , नसरीन शौकत पटेल व अरबाज शौकत पटेल यांच्यावर गुन्हा नोंद केला होता व याप्रकरणी दोन महिलांची चौकशी चालू होती व अरबाज पटेल हा फरार होता . दोन दिवसांच्या चौकशी अंती शुक्रवार दि.६ रोजी नसरीन शौकत पटेल व अरबाज शौकत पटेल या दोघींना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता आठ तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली .पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक रमाकांत शिंदे हे करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *