नाईचाकूरात खड्डा खोदून अखोरी कृत्य करण्याचा डाव उघड !

उमरगा – रोहित गुरव

घरातील व्यक्ती आजारी रहात असल्याने अंधश्रद्धेचे अघोरी कृत्य करण्याचा प्रकार तालुक्यातील नाईचाकूर येथील एका मुस्लीम समाजाच्या घरात उघडकीस आला. दरम्यान साधारणतः चार बाय चार आकाराचा (रुंदी, लांबी व खोली) खड्डा करुन त्यात पुजेचे साहित्य ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने दोन महिला व एका पुरुषावर रात्री गुन्हा दाखल प्रक्रिया चालू होती .
या बाबतची माहिती अशी की, नाईचाकूर येथे हैदर महेबुब मुल्ला यांच्या नावे पूर्नवसित घर आहे. हैदर मुल्ला यांचे निधन झाल्याने दोन खोलीच्या घरात कुणीही रहात नव्हते. या घरात तैसिन पाशामियाँ मुल्ला हिने घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे कसली तरी पुजा करणार असल्याची माहिती आतिक महेबूब मुल्ला यांनी पोलिस पाटील बाळू स्वामी यांना सांगितली. तेंव्हा श्री. स्वामी यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माधव विठठल पवार, राजेंद्र काशीनाथ डिगुळे, गोविंद माधवराव पवार व अन्य लोकांना घेऊन त्या घराची पाहणी केली असता एका खोलीत फरशा काढून एक मोठा खड्डा खोदलेला दिसला, त्यामध्ये फुटलेले नारळ, लिंबु असे पुजाचे साहित्य पुजा करून पडलेले होते. तसेच बाजुस दोन टिकाव, फावडा पडलेला दिसून आला व बाजुचे खोलीमध्ये तीन कलताणी पोते, दोन लिंबु व नारळ असे साहित्य अघोरी प्रथा व जादुटोना करून पडलेले दिसले. या बाबत गावातील सर्व लोकांनी तैसिन पाशामियाँ मुल्ला यांना विचारपुस केली असता तिने त् सांगितले की, माझी उमरगा येथील बहीण नामे नसरिन शौकत पटेल ही जास्त आजारी पडत असल्यामुळे तिला कोणी तरी गांभिकपणे तुम्ही तुमच्या बंद घरात खड्डा खोदुन त्यात नारळ, लिंबु पुजा करून टाका असे सांगितले. त्यानुसार मी स्वतः, माझी बहिण नसरिन पटेल, बहिणीचा मुलगा अरबाज शौकत पटेल २४ ऑक्टोबरला रात्री बारा वाजता आमचे जुने बंद घरातील खोलीमध्ये खड्डा खोदुन त्यामध्ये लिंबु नारळ व पुजा करणार होतो असे सांगितले. दरम्यान हा प्रकार अंधश्रद्धेतुन केल्याचे प्रथमदर्शनी दिसल्याने पोलिस पाटील श्री. स्वामी यांनी पोलीसांना कळविली. पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसूरे, बीट अंमलदार दत्ता शिंदे व अन्य कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तैसिन मुल्ला, अरबाज पटेल यांनी नसरिन पटेल ही आजारी पडत असल्याने कोणत्या तरी मंत्रिकाच्या सांगण्यानुसार अंधश्रद्धेचे अघोरी प्रकारे कृत्य केले. या प्रकरणी पोलिस पाटील बाळू स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमरगा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *