लोहारा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी केली कोरोनाबद्दल जनजागृती-उस्मानाबाद-गाव माझा न्यूज

प्रतिनिधी -गणेश खबोले लोहारा, उस्मानाबाद

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नंदिनी चंद्रशेखर हंगरगे व सृष्टी हेमंत श्रीगिरे,धनराज हेमंत श्रीगिरे या बालक विद्यार्थीनी कोरोना बद्दल पोस्टर तयार करून जनजागृती करत आहेत.नागरिकांनी घराबाहेर पडू नये,हात साबणाने धुवावे,सोशल डिस्टन्स पाळणे,नागरिकांनी मास्क वापरावे,बाहेरून घरी आल्यावर सॅनिटाईझरने किंवा साबणाने हात धुवावे या इतर उपाययोजने बद्दल पेपर मधील कात्रण व हाताने चित्र काढुन जनजागृती करत आहेत.गो कोरोना, मीच माझा रक्षक असा संदेश पोस्टर वर लिहीत या बालकांनी कोरोना विषाणूला जाण्याची विनवणी केली आहे.
शहरातील डॉ.चंद्रशेखर हंगरगे हॉस्पिटल,डॉ
हेमंत श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये रुग्णाची नेहमीच वर्दळ असते.येणाऱ्या रुग्ण, नागरिकांना कोरोना बद्दल या लावलेल्या पोस्टर द्वारे जनजागृती होत आहे.फलकाच्या माध्यमातून जनतेला स्वतः स्वस्थ रहा आणि इतरांना देखील स्वस्थ राहू द्या असा संदेश दिला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.शासन पातळीवर प्रयत्न होत असले तरीही जोवर नागरिकांमध्ये जागृती होत नाही तोपर्यंत या आजाराला रोखणे कठीण आहे.त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना घरा बाहेर न पडता बसण्याचे आवाहन,आपण आपली काळजी कशी घ्यावी ? आजाराची लक्षणे काय आहेत याचीही माहिती पोस्टर द्वारे नागरिकांना दिली.

One thought on “लोहारा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी केली कोरोनाबद्दल जनजागृती-उस्मानाबाद-गाव माझा न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *